![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() |
Srimati Shevantabai Kankavlikar,It all started with this great person who first recognized Sri Bhalchandra Maharaj's spiritual powers and served him.
हीच ती थोर माउली जिने एका विवस्त्र व वेडसर दिसणाऱ्या व्यक्ती मधला परमेश्वर ओळखला आणि इतर दगड मारत असताना व हाड हाड करून त्यांना दूर लोटत असताना स्वतच्या मुलासारखी त्याची निगराणी केली.त्याच्या मधले देवत्व जगाला नंतर दिसले,पण या माउलीचा अंतरआत्म्यने ते आधीच ओळखले होते.या माउलीचे नाव शेवंताबाई कणकवलीकर,आणि त्या वेड्या बावळा दिसणाऱ्याचे आज सर्वाना ज्ञात असलेले नाव प.पू.भालचंद्र महाराज !त्यानंतर जवळजवळ २५ वर्षांनी प.पू.भालचंद्राच्या सेवेसाठी आसुसलेल्या धर्माराजना याच माउलीने आपल्या घरात आश्रय दिला आणि इथूनच श्रीराम /हनुमंताची हि जोडी पुढे भालचंद्र महाराज आणि धर्मराज महाराज म्हणून जगाला ज्ञात झाली.